200 350
Download Bookhungama App

Dev Chalale - दि.बा. मोकाशी

Description:

ज्याला आदी नाही आणि अंत नाही अशा परमेश्वराची ही गोष्ट आहे. त्यामुळे ह्या गोष्टीला प्रारंभ नाही आणि शेवटही नाही.  ह्या वेळी परमेश्वराचे नाव नरसिंह असे आहे. हा परमेश्वराने घेतलेल्या अवतारातला चौथा अवतार. त्याचे अवतारकार्य केंव्हाच संपले आहे आणि तो आता देवघरात मूर्ती होऊन बसला आहे, एका खेडेगावातल्या घरात.  ह्या घरात मूर्ती येऊन ३०० वर्षे झाली आहेत. परमेश्वर आणि माणूस ह्यांचे नाते अतिशय विचित्र आहे. ते पुरातन आहे. ह्या शिवाय त्या विषयी काही निश्चित सांगता येईल असे नाही. एक किंवा अनेक कारणांनी माणसाला परमेश्वराची गरज आहे हे उघड दिसते. पण परमेश्वराला माणसाची गरज आहे का? हे सांगता येणार नाही. ते कुणालाच ठाऊक नाही. पण आपण माणसे चिवट आहोत. त्या घरातली माणसेही तशीच आहेत. ३००हुन अधिक वर्षे ह्या नरहरी देवाची मूर्ती हे कुटुंब कवटाळून बसले आहे आणि ही त्याचीच गोष्ट आहे.

"देव चालले" - लेखक दि.बा. मोकाशी आणि सादर करीत आहेत: रवींद्र दामोदर लाखे.
Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि