200 400
Download Bookhungama App

दर्पण भाग १ - आशा बगे

Description:

दर्पण - गेल्या काही दशकांत, जोमदारपणे लेखन करून ज्यांनी रसिकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले त्यांमध्ये आशा बगे यांचे प्रामुख्याने गणना होते.

विशेषत: कथात्म मूल्य असलेले, एकमेकाशी संवादी असे वाङ्मयप्रकार त्यांच्या प्रतिभागुणाला मानवतात. त्या त्या वाङ्मयप्रकारातल्या विकासाच्या शक्यता समर्थपणे शोधत त्यांचे लेखन प्रवास करताना दिसते. 'मारवा' हा कथासंग्रह, 'दर्पण' हा प्रस्तुत दीर्घकथासंग्रह, 'त्रिदल' ही कादंबरी अशा त्यांच्या पुस्तकांचा या निमित्ताने आवर्जून उल्लेख करता येईल.

मध्यप्रदेश व महाराष्ट्र यांच्या सीमेवरले, बहुतांशी तिथल्या मध्यमवर्गाच्या जीवनाचे दर्शन त्यांच्या लेखनातून घडते. त्या परिसरातल्या भाषिक लकबी, रीतीभाती यांचा गोडवा सहजपणे त्यांच्या लेखनात मुरून राहिला असतो.

ह्या सर्वांमागे माणसाच्या जीवनाला नियंत्रित करणारी एक अतर्क्य शक्ती कुठेतरी वसत असल्याचा विश्वास सूक्ष्मपणे त्यांच्या लेखनातून व्यक्त होत असल्याचा अनुभव येतो.

'दर्पण' हा आशा बगे यांचा ७ दीर्घकथांचा संग्रहः तन्मयतेने लिहिल्या गेलेल्या त्यांच्या या कथांतून त्यांच्या लेखनशक्तीची एकवटलेली वैशिष्ट्ये प्रकटतांना जाणवतील.
Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि