Id SKU Name Cover Mp3
Chini-Suraskatha-Part-2


20.00 40.00
Download Bookhungama App

चिनी सुरसकथा - भाग २ -

Description:

चिनी सुरसकथा - भाग २ रा अद्भुत,शृंगार, प्रणय नि साहसाने भरलेल्या आणि वैचित्र्यपूर्ण प्रेमप्रसंगांनी पानोपानी बहरलेल्या कथा आता वाचा इ-बुक स्वरुपात.

 प्रास्ताविक

प्रिय वाचक,

आज आपल्या हाती प्रणय, शृंगार, अद्भुत नि साहस यांनी बहरलेल्या याचिनी सुरसकथा भाग- चा खजिना सादर केला जात आहे.

आजपर्यंत तुम्ही अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी वाचल्या आहेत. त्यांतील अलीबाबा व चाळीस चोर, अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा, सिंदबादच्या सफरी या कथांनी तर साऱ्या जगाला अक्षरशः वेड लावलं आहे. अरबी भाषेतील या कथांच्याप्रमाणे प्रस्तुत पुस्तकातील चिनी कथाही प्राचीनतम अशा आहेत आणि वाचकांची जबरदस्त करमणूक करण्याचं सामर्थ्य यातही आहे.

नाईल नदीकाठची अरबी संस्कृती, गंगा-सिंधुकाठची आर्य संस्कृती नि यांगत्सिक्यांग नदीकाठची चिनी संस्कृती या अति प्राचीन आणि पूर्वीपासून विकसित असलेल्या संस्कृती होत. या संस्कृतिंनी अनेक लोककथांचा अद्भुत कथांचा बहुमोल खजिना जतन करून ठेवला आहे. त्यातील चिनी खजिन्याची ही एक झलक !...

या पुस्तकातील कथांमधले कथानक अर्थातच मुळचे चिनी भाषेतले आहे. त्यावर चढविलेला आधुनिक मराठीचा पेहराव फक्त माझा आहे. काही ठिकाणी कथानकात आवश्यक तेथे थोडाफार बदल केला आहे. त्याचप्रमाणे पुस्तकाच्या अखेरीस महाराणी गुलशनच्या तोंडून व्यक्त झालेले विचार हे अर्थातच माझे आहेत.

चिनी खाना जगात प्रसिद्ध आहे. लोकप्रिय आहे !...

तुम्हास हीचिनी मेजवानीकिती आवडते ते आता पहायचे !

आपला नम्र,

श्रीविलास द. कुलकर्णी


Format: Adaptive

Publisher: उमा प्रकाशन (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)