30.00 66.00
Download Bookhungama App

भारताचा सांस्कृतिक दिग्विजय - डॉ. रमेशचन्द्र कुळकर्णी

Description:

‘भारतस्य सांस्कृतिको दिग्विजयः।’ या श्री. हरिदत्त वेदालंकार यांनी लिहिलेल्या पुस्तकातील काही उताऱ्यांचे रुपांतरभारताचा सांस्कृतिक दिग्विजय

आमचे एक आदरणीय वयोवृद्ध सुहृद आहेत.
श्री. रा. रा. गो. . जोशी, २७६, रामनगर, नागपूर. मनाने वीस वर्षे वयाचे, अन् शरीराने ऐंशी वर्षे वयाचे. आदरणीय म्हणण्यात मी हात आखडता घेतो आहे. खरे म्हणजे ते वंदनीय आहेत.
(दि. १६ - ११ - १९९२ रोजी सोमवारी ते स्वर्गवासी झाले.)

ललित साहित्य आणि धर्मशास्त्र वगळता जे ही ज्ञान विज्ञानाचे क्षेत्र असेल त्याबद्दल उपलब्ध असलेले संस्कृत ग्रंथ व त्यांचा अनुवाद जमवणे हा त्यांचा छंद. आपल्या प्राचीन शास्त्र विज्ञानाबद्दल माहिती असलेले इंग्रजी व मराठी ग्रंथ देखील त्यांचे संग्रही आहेत. ज्या दुर्मीळ ग्रंथांच्या जगांत कदाचित एकाद दुसऱ्याच प्रती शिल्लक असतील असेही काही ग्रंथ आज त्यांचे जवळ उपलब्ध आहेत. इतक्या जिज्ञासू वृत्तीच्या व अभ्यासू वृत्तीच्या व्यक्ती देखील आजकाल फार दुर्मीळ झाल्या आहेत.

आज त्यांचे संग्रही सुमारे ट्रकभर ग्रंथ आहेत. त्यांचेकडे गेले म्हणजे सरस्वतीच्या भव्य प्रासादात आपण दाखल झालो आहोत असे वाटते. जिकडे तिकडे ज्ञानाचा लख्ख प्रकाश जाणवतो.

एका सौम्य आणि प्रसन्नतेचे वातावरण निर्माण करणाऱ्या पणतीच्या ज्योतीने दुसरी ज्योत पेटवावी त्या प्रमाणे त्यांचा हा ग्रंथसंभार पाहिला म्हणजे वाटते की या ग्रंथ भांडाराची १) अंकगणित, ) बीजगणित, ) भूमिती, ) भौतिकशास्त्र, ) रसायनशास्त्र, ) जीवशास्त्र, ) इतिहास, 8) भूगोल, ) नागरिकशास्त्र, १०) समाजशास्त्र, ११) न्यायशास्त्र, १२) राज्यशास्त्र, १३) अर्थशास्त्र अशी गटशः विभागणी करावी आणि एकेका ग्रंथाचा सुलभ मराठी भाषेत व त्यानंतर हिंदी भाषेत अनुवाद करावा. प्रथम महाराष्ट्र उजळून टाकावा आणि मग हिंदीच्या माध्यमातून सारा भारत ज्ञानाच्या तेजाने झळकावा. भारतीय दृष्टिकोनातून ज्ञान - विज्ञानाचा अभ्यास झाला म्हणजे काही वेगळे प्रयोग सुरू होतील, काही वेगळे शोध लागतील. पौर्वात्य देशातील जपानच्या व पाश्चिमात्य देशातील अमेरिकेच्या प्रगतीमुळे छाती दडपण्याची पाळी येणार नाही. कमीपणा वाटण्याचे कारण उरणार नाही. भारतीयांच्या घोडदौडीला कोणी रोखू शकणार नाही. अतिसामान्य व्यक्तिचाही विकास साधू शकेल अशी आपली स्वतःची राज्यघटना तयार करण्यासाठी पाश्चात्यांच्या लोकशाही प्रणालीच्या कुबड्या वापरण्याची गरज उरणार नाही.

एकतर असे काही करावे नाहीतर थेट बालक मंदिरापासून महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत संस्कृत सक्तीचे करण्यासाठी चळवळ उभारावी.

म्हणूनच वेळोवेळी मी त्यांना आर्जवे करीत असतो की हे ग्रंथ भांडार त्यांनी नागपुरातच ठेवावे. परंतु त्यांचा दृष्टिकोन अधिक विशाल. जेथे या ग्रंथांचे काळजीपूर्वक जतन व अध्ययन होईल अशा स्थळी ते हा ग्रंथसंभार सोपविणार आहेत. भारतात कुठेही, वेळ पडली तर परदेशात सुद्धा!

असेच एकदा बोलण्याच्या ओघात सहजपणे त्यांनी एक संस्कृत ग्रंथ हाती दिला. ‘वाचून पहा, सगळे समजते!’ म्हणून धीरही दिला.

भारतस्य सांस्कृतिको दिग्विजयः।हे त्या पुस्तकाचे नांव. श्री. हरिदत्त वेदालंकार यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचा अनुवाद श्री. कालिकाप्रसाद शुक्ल यांनी केला असून त्याचे संपादनही त्यांनीच केले आहे. संस्कृत विश्वविद्यालय, वाराणसी - २ यांनी १९६७ साली हा ग्रंथ प्रकाशित केला असून त्याची किंमत अवघी दहा रुपये आहे.

साशंक मनःस्थितीत मी तो वाचायला घेतला, आणि आश्चर्य म्हणजे बराचसा समजला.

आज हिंदू धर्माला जे निरनिराळे हादरे बसत आहेत त्यामुळे आपण सगळेच संभ्रमित झालो असून एक तऱ्हेचा विकृत मनोगंड हिंदुधर्मात निर्माण होऊ पहात आहे.

या पुस्तकाच्या वाचनाने सारे मनोमालिन्य झटक्यात दूर होऊन भारतीय संस्कृतीच्या उज्ज्वल भवितव्याची खात्री पटते. सध्याच्या परिस्थितीत सांस्कृतिक दिग्विजयासाठी कोणते मार्ग चोखाळता येतील याची सुस्पष्ट कल्पना येते. कोठेही अतिशयोक्ती नाही. भ्रामकता नाही. अतिशय वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून लिहिलेले हे पुस्तक प्रत्येकाने अवश्य वाचावे असेच आहे.

पुस्तकातील मला पटलेल्या काही उताऱ्यांचे शक्यतो शब्दशः रुपांतर पुढे देत आहे. जिथे अडखळलो तिथे अर्थ समजून घेण्यासाठी मी इतरांची मदत घेतली आहे.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि