Id SKU Name Cover Mp3
Ayushyachi Choti Goshta part 2


100 200
Download Bookhungama App

आयुष्याची छोटी गोष्ट - भाग २ - भारत सासणे

Description:

माणसाची जटिलता कथेचं आव्हान असतं. माणसाचं जगणं गुंतागुंतीचं होत आहे हे कथेला दिसत असतं. माणसाचा शोध हे कथेच्या अंतर्गत प्रवासाचं कारण आहे. माणसाला मुक्तीचं आकर्षण आहे आणि मुक्तीचं भयही. पण अनेक धागे त्याला बांधून ठेवतात. ‘अमुक्ती’ मध्ये त्याचं मनुष्यपण आहे हे माणसाला बहुधा लक्षात येत नाही. संवेदना हरवून जाण्यापूर्वीपर्यंत माणूस आत्मशोध घेताना दिसतो.
‘आयुष्याची छोटी गोष्ट’ या संग्रहातल्या काही कथा माणसाचा आणि त्याच्या आत्मशोधाचा वेध घेण्याचा प्रयत्न करतात. शोध संपणारा नसतो, माणसाच्या जिण्याबद्दल आणि त्याच्या अंतरविश्वाबद्दलचं कुतूहलही संपणारं नसतं. म्हणून या काही कथा, शोधातल्या प्रवासातल्या. त्याचे हे ऑडिओबुक तुम्हाला नक्की आवडेल! 
Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि