200 300
Download Bookhungama App

अमृतवाणी -

Description:

वेद-गोविंद प्रस्तुत 'अमृत वाणी' मध्ये काय ऐकाल --- तर आपल्या थोर संतांनी केलेल्या सुंदर,  सुलभ काव्य रचना .. ज्यांना स्वरसाज चढवला आहे सौ. मनिषा पेंडसे यांनी. संतरचनांचं वैशिष्टय म्हणजे त्यातील सहजता  लयबद्धता व गेयता. मनिषाताईंनी ७ संतांच्या काही रचना निवडून त्यांना शास्त्रीय संगीतात गुंफले आहे. यमन, खमाज , पुरिया धनाश्री , बिलासखानी तोडी,  जयजयवंती, गौडसारंग अशा सुंदर रागांबरोबर मारवा, दरबारी कानडा असे रागही ताईंनी निवडले आहेत. 

समर्थ रामदास स्वामींची 'करुणाष्टके' आणि शिवरंजनीचे मनाला भिडणारे सूर - हा म्हणजे 'दुग्ध-शर्करा'योग झाला आहे. या रचना, रागांवर आधारित असल्याने, ज्यांना शास्त्रीय संगीत येत नाही पण आवडते, अशा रसिकांसाठी, यातील प्रत्येक रागाचे चलन, गायिका सौ. प्रतिभा शिदोरे यांनी थोडक्यात सांगितले आहे. त्यांनी या रचनांना आपल्या सुरेल गायकीने पुरेपुर न्याय दिला आहे . त्यांची एक छोटी शिष्या ईशा सुपेकर हिने या अमृतवाणीमध्ये एकनाथ महाराजांचे एक भारुड गायले आहे.

प्रतिभाताईंची मुलगी मधुरा हिने  संवादिनीची साथ करून व  मुलगा सुशांत याने तबल्याची साथ देऊन रंगत वाढवली आहे. प्रतिभाताईंना गायनाची साथसंगत दिली आहे त्यांच्याच शिष्या सौ. अनुजा मेहेंदळे,  सौ. मेधा केंभावी , ईशा सुपेकर आणि सौ. रमा जोशी (टाळ वादन) यांनी. निवेदिका सौ. चित्रा सुपेकर यांनी साध्या -सोप्या भाषेत अभंगांचा मथितार्थ  आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. त्यांना मार्गदर्शन केले आहे डाॅ. सौ. सुमेधा आठवले यांनी. सर्व कलाकारांच्या प्रयत्नांतून ही अमृतवाणी साकार झाली आहे . जरूर ऐका व आम्हाला आपले अभिप्राय कळवा... 

गायिका - सौ. प्रतिभा शिदोरे 

साथसंगत

संवादिनी - मधुरा शिदोरे

तबला - सुशांत शिदोरे

टाळ - सौ. रमा जोशी

सहगायिका - सौ. अनुजा मेहेंदळे, सौ. मेधा केंभावी, ईशा सुपेकर
Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि