Id SKU Name Cover Mp3
Aaple-San-Utsav-Aani-Prampra


30.00 58.00
Download Bookhungama App

आपले सण उत्सव आणि परंपरा - ज्योतिषी ब. वि. तथा देशपांडे (गुरुजी)

Description:

सुखी आणि समृद्ध जीवनासाठी सुयोग्य अशा संस्कारांची गरज आहे. अशा सुसंस्कारांच्या अखंड वाहणाऱ्या प्रवाहातच आपला जन्म होतो. आपण साजरे करतो, ते सण आणि उत्सव हा त्या प्रवाहाचा दृश्य आविष्कार आहे.लेखकाचे मनोगत

साधुसंत येती घरा। तोचि दिवाळी दसरा।।

दसरा दिवाळीसारखे सण आनंदाचा वर्षाव करतात. अतिथी आपण देवासारखाच मानावा, त्याचे स्वागत करावे. साधू-संत महात्मे आपल्या घरी येणे आनंद देणारे आहे. त्यांचा सहवास सुखकारक असतो. असा आपल्या पूर्वजांचा अनुभव आहे. दिवाळी-दसऱ्यासारखे सण आपण अत्यंत उत्साहाने साजरे करतो. अनेक चांगल्या उपक्रमांची सुरुवात या निमित्ताने होते. माणसाचे एकत्र येणे हीच गोष्ट आज धावपळीच्या जगात कठीण होत चालली आहे. सणाच्या निमित्ताने हे घडत असेल, तर त्याचे स्वागतच झाले पाहिजे.

परंपरा आपण मानतो. आपल्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे. भारतीय संस्कृती अत्यंत समृद्ध आणि पुरातन आहे. त्याचा गर्व बाळगण्यात वावगे असे काही नाही. पण अनेकदा ज्याचा अभिमान बाळगायचा ते नेमके काय आहे, हे समजून घेतले जात नाही. सणउत्सवांचा अंगीकार करताना, त्याचे पालन करताना अनेकदा मूळ उद्देश नजरेआड होतो आणि केवळ कर्मकांड तेवढे ध्यानात राहते.

सुखी आणि समृद्ध जीवनासाठी सुयोग्य अशा संस्कारांची गरज आहे. अशा सुसंस्कारांच्या अखंड वाहणाऱ्या प्रवाहातच आपला जन्म होतो. आपण साजरे करतो, ते सण आणि उत्सव हा त्या प्रवाहाचा दृश्य आविष्कार आहे.

चैत्र ते फाल्गुन असे सण, उत्सव आणि परंपरा यांची ह्या पुस्तकात माहिती देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे. एकूण वर्षभरात रोजच्या दिनविशेष मध्ये काही ना काही महत्त्व आहे. श्रावण, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष आणि चातुर्मास्याचे चार महिने जवळजवळ रोजच सणवाराचे महत्त्व असते. म्हणून त्यातील रूढीनुसार आत्ताच्या काळात चालू असलेले सण ह्या पुस्तकात देण्याचा प्रयत्न केला आहे.

एकत्र कुटुंबव्यवस्था आपल्या समाजात होती, त्यावेळी श्रमविभागणीचे तत्त्व आचरणात होते. ‘चूल आणि मूलहे स्त्रियांचे विश्व होते. आज काळ पालटला. जीवन धावपळीचे झाले. ज्यांच्यावर सण उत्सव साजरे करण्याची मोठी जबाबदारी परंपरेने सोपविली, त्या महिला शिकल्यासवरल्या. नोकरी - व्यवसायात त्यांनी खूप पुढे मजल मारली, तरीही इच्छा असो वा नसो, अनेक सण जुन्याच परंपरेने, रूढीनुसार आणि कुलधर्म कुलाचारांनी केले जातात. जसे, गणपती उत्सवात कोणाचा गणपती दीड, तीन, पाच, सात, दहा आणि एकवीस दिवसांचा असतो.

श्रावणात अनेक सण, वार उत्साहाने साजरे केले जातात. अनेक सासुरवाशिणी मुली, माहेरी आल्यानंतर झोका खेळायच्या, झिम्मा -फुगडीसारखे खेळ, फेर धरून गाणी म्हणणे हे सर्व चालायचे. नागासारख्या विषारी प्राण्याला आपल्या पूर्वजांनी दैवत का मानले, हे मात्र समजून घेतले जात नाही. त्याचा अभ्यास केला जात नाही. त्यामुळे ८० टक्क्यांहून अधिक साप बिनविषारी असूनही सरसकट मारले जातात. पर्यावरणरक्षणातील, शेतीरक्षणातील सापाचे महत्त्व आपण लक्षात घ्यावे.


Format: Adaptive

Publisher: उमा प्रकाशन (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)