40.00 92.00
Download Bookhungama App

आध्यात्म उपनिषद - स्वामी श्रीकृष्ण भारती (पोंक्षे)

Description:

अध्यात्म एक अशी अनुभूती आहे की, जी अभिव्यक्त होऊ शकत नाही. त्याविषयी फक्त इशारे करता येतील. परंतु इशारे म्हणजे अभिव्यक्ती नाही, हे लक्षात ठेवायला हवे. बोटानी चंद्र दाखवता येईल पण बोट म्हणजे चंद्र नाही.

अध्यात्माचे कुठलेही शास्त्र नाही. पण अशीही काही शास्त्रे आहेत की, जी अध्यात्माकडे इशारे करत आहेत. परंतु हे सर्व इशारे मनोवैज्ञानिकच आहेत. इशारे म्हणजे अध्यात्म नाही. अध्यात्म तेच आहे की, या इशाऱ्यांनी प्रवास केल्याने उपलब्ध होईल. अध्यात्माची कुठलीही अभिव्यक्ती संभवनीय नाही, आंशिकसुद्धा संभवनीय नाही किंवा त्याचे प्रतिफलनही संभवनीय नाही. उपनिषदाचे महाद्वारी...

अध्यात्म एक अशी अनुभूती आहे की, जी अभिव्यक्त होऊ शकत नाही. त्याविषयी फक्त इशारे करता येतील. परंतु इशारे म्हणजे अभिव्यक्ती नाही, हे लक्षात ठेवायला हवे. बोटानी चंद्र दाखवता येईल पण बोट म्हणजे चंद्र नाही.

अध्यात्माचे कुठलेही शास्त्र नाही. पण अशीही काही शास्त्रे आहेत की, जी अध्यात्माकडे इशारे करत आहेत. परंतु हे सर्व इशारे मनोवैज्ञानिकच आहेत. इशारे म्हणजे अध्यात्म नाही. अध्यात्म तेच आहे की, या इशाऱ्यांनी प्रवास केल्याने उपलब्ध होईल. अध्यात्माची कुठलीही अभिव्यक्ती संभवनीय नाही, आंशिकसुद्धा संभवनीय नाही किंवा त्याचे प्रतिफलनही संभवनीय नाही.

कारण असे की, जेव्हा अध्यात्माचा अनुभव होतो, तेव्हा कुठलाही विचार मनात असत नाही. आणि ज्या अनुभवात विचारच उपस्थित नसतो, त्या अनुभवाला विचार प्रगट कसा करू शकेल? विचार त्याच अनुभवाला प्रगट करू शकतो की, ज्या अनुभवात तो उपस्थित असतो, त्याचा साक्षी असतो. अध्यात्माचा अनुभव निर्विचार अनुभव आहे. विचार तेथे अनुपस्थित असतो. म्हणून विचार त्याविषयी काही त्याचे दर्शन घडवू शकणार नाही.

म्हणूनच सारी उपनिषदे सांगून-सांगून थकून जातात आणि अखेर नेति-नेति म्हणून बोलणेच बंद करतात. हे ही नाही आणि ते ही नाही. विचारले, मग काय आहे? तो मनुष्य म्हणेल की, हे ही नाही, ते ही नाही म्हणजे काहीच नाही- मग काय आहे तो अनुभव? जो साऱ्या सांगण्याच्या बाहेर राहतो?

दुनियेमध्ये ज्यांना अध्यात्मिक अनुभव आहे त्यांचा असाही अनुभव आहे की, तो अभिव्यक्त करता न येण्यासारखाच आहे.

घेऊन गुळाचा स्वाद। करिल का मुका अनुवाद।

या इथे अवस्था ऐसी। अनुभवास नसती शब्द।।

अशीच तेथे अवस्था असते. मुक्या व्यक्तीला गुळाचा स्वाद कळत नाही असा त्याचा अर्थ नाही. त्याला त्याचा अनुभव पूर्णपणे आलेला असतो, तरीही तो त्याला शब्दात वर्णन करू शकत नाही. मुकाच नव्हे तर बोलणाराही सांगू शकणार नाही, की कसा आहे नेमका त्याचा स्वाद। जास्तीत जास्त तो इतकेच करू शकतो की, गुळाचा खडा तो आपले हातात देऊ शकतो. परंतु अध्यात्म गुळाच्या खड्यासारखे आपल्या हातात नाही देता येत की, पहा चाखून, आणि घे अनुभव।

म्हणून दुनियेतील कुठलेही शास्त्र अध्यात्मशास्त्र नाही. दुनियेत अशी शास्त्रे जरुर आहेत की जी अध्यात्माकडे इशारे करीत आहेत. ‘आध्यात्म उपनिषदहीअशा शास्त्रातीलच एक शास्त्र आहे मनाचे पार नेणारे-विचाराचे पार-निर्विचारात नेणारे एक मनोविज्ञानच आहे. शास्त्राची उंचात-उंच उंची मनच आहे. शब्दाचीही उंचच उंच ज्याची संभावना मनच आहे. अभिव्यक्तीची अंतिम सीमा मनच आहे. जेथपर्यंत मन आहे तेथपर्यंत अभिव्यक्तीची शक्यता आहे आणि जिथे मनच नाही तेथील सारे अनुभव अप्रगटच राहून जातात. अध्यात्माचा अनुभव हा मनाचे पारचा निर्विचाराचा अनुभव आहे। तरीही त्याचेविषयी काही दिशानिर्देश करण्याचा प्रयत्न करूणावश होऊन येथे ॠषीने केला आहे हे ध्यानी घेणे आवश्यक आहे।

- वेदमूर्ति विवेकशास्त्री गोडबोले


Format: Adaptive

Publisher: श्रुतीगंध (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)