Id SKU Name Cover Mp3
हर्षमती


60 116
Download Bookhungama App

हर्षमती - नफिसा सय्यद

Description:

राजकुमारी हर्षमती आणि समर्थ यांची झालेली ताटातूट. हर्षमती आणि समर्थानी येणाऱ्या प्रत्येक समस्येला दिलेले कडकडून उत्तर यांचं रोमांचक वर्णन मी प्रमाण भाषेसोबतच कधी कधी प्राकृत भाषेत केलेलं आहे.‘हर्षमती’ प्रत्येक मुलीच्या मनात असलेली राजकुमारीची छबी आहे. राजकुमाराच्या प्रेमात विलीन होणाच्या कथा, शौर्यवान राजकुमाराची स्वप्न. महाराज आणि महाराणीची प्रेमकथा, राजहित कारणाने झालेले विविधपूर्ण विवाह सोहळे. यांचे रसग्रहण करत वाढलेली राजकुमारी हर्षमती.

तिच्या मनावर हुकूमत करणारा एक वीर शौर्यवान सेवक. महालातल्या लपून झालेल्या चांदण्या रातीच्या भेटीपासून ते आश्रमात ऋषींच्या सानिध्यात झालेला विवाह.

पुढे राजकुमारी हर्षमती आणि समर्थ यांची झालेली ताटातूट. हर्षमती आणि समर्थानी येणाऱ्या प्रत्येक समस्येला दिलेले कडकडून उत्तर यांचं रोमांचक वर्णन मी प्रमाण भाषेसोबतच कधी कधी प्राकृत भाषेत केलेलं आहे. कहाणीतला प्रत्येक प्रसंग मांडताना तो समोर जगल्याचा अनुभव घेतला आहे. हा प्रवास माझ्यासाठीही तितकाच रोमांचक होता.
विक्रमकाकांनी यात खूप मोलाची मदत केली. सुरुवातीलाच माझ्या मनात ही मालिका जन्म घेत असताना ती व्यक्त कशी करावी हा मोठा प्रश्न विक्रमकाकांनी अगदी एका क्षणात सोडवला.

मी ‘न लिहिलेली पत्रे’ चे मनापासून आभार मानते. काकांची तर मी ऋणी आहेच. पुस्तकाच्या प्रकाशनाच्या बातमीने खूप आनंदायी धक्का दिला.

आई नेहमी म्हणते जे काम करेल ते पूर्ण मन लावून कर आणि काकांनी कुठे, कसा जीव ओतायचा हे शिकवलं.

माझ्या मालिकेचे वाचक नेहमी प्रोत्साहन देणारे ठरले. या मालिकेने वर्षभरातून जास्त काळ घेतला त्यात आलेल्या अडचणी पार करत पहिलं पाऊल लेखनाच्या क्षेत्रात टाकता आलं याचं संपूर्ण श्रेय ‘न लिहिलेली पत्रे’, काका आणि वाचक मंडळींचा आहे.

मला खात्री आहे हे पुस्तक वाचून तुम्हाला नक्कीच एका वेगळ्या भाषेचा गोडवा अनुभवता येईल आणि हर्षमती आपलीशी वाटू लागेल.

(हे एक काल्पनिक कथानक आहे.)


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि