Id SKU Name Cover Mp3
सकल हृदया


80 174
Download Bookhungama App

सकल हृदया - चिन्मय मांडलेकर

Description:

चिन्मय च्या लेखांचा हा संग्रह आहे. नर्म विनोदी आणि सूक्ष्म निरीक्षण ही ह्या लेखांची बलस्थाने आहेत. चिन्मय ने विविध विषय ह्या पुस्तकात हाताळले आहे. हे पुस्तक एकाच वेळी माहितीपूर्ण आणि मनोरंजक सुद्धा झाले आहेत.

This collection of articles written by Chinmay. The book is laced with humor and keen observations. Chinmay has handled variety of topics and book is simultaneously informative and entertaining.चिन्मय मांडलेकर ह्या नावाची ओळख महाराष्ट्राला करून देण्याची तशी आवश्यकता नाही.  राष्ट्रीय नाट्यशाळेचा स्नातक, उत्तम अभिनेता, दिग्दर्शक, नाटककार, ह्या शिवाय अत्यंत लोकप्रिय मालिकांचे कथा पटकथा लेखक म्हणून सुद्धा ते खूप प्रसिद्ध आहेत. आणि तरीसुद्धा ती ओळख काही अंशी अपुरी अशी आहे असे मला तरी वाटते. ह्याचे कारण त्यांचे स्फुटलेखन!

बऱ्याच जणांना हे ठाऊक नसेल की चिन्मय एका मासिका साठी स्फुटलेखन करीत असत. स्फुट लेखनाची काही वैशिष्ट्य असतात. एक तर ती आजच्या किंवा कालच्या घटनेवर भाष्य करीत असतात. म्हणजेच त्यांचे ताजेपण महत्वाचे असते. ते लेखन घडलेल्या घटनेवर भाष्य तर करतेच पण त्या घटनेच्या अंतरंगात डोकावून एक वेगळा विचार वाचाकां समोर मांडण्याचा जरूर प्रयत्न करते.  त्या लेखनात टीका असते पण त्या टीकेत विखार नसतो. एक विधायक चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न अशा स्फुट लेखनात असते. वैचारिक मंथनाचे असे स्फुट लेखन हे अधिष्ठानच असते.

स्फुट लेखन करण्यासाठी लेखका कडे खूप वेळ आणि अवधी नसतो. म्हणजेच त्याचे लक्ष चौफेर असायला हवे.  त्याने सूक्ष्मपणे घडणाऱ्या घटना टिपायला हव्यात आणि मग एखाद्या निवडक घटनेवर आपले विचार नोंदवायला हवेत. तसे हे शिवधनुष्य पेलण्या सारखेच. दररोज लिहिणे किती अवघड असते हे वृत्तपत्रात जे लेखक दैनिक किंवा साप्ताहिक सदर लिहितात तेच ओळखू शकतात. चिन्मय मांडलेकरांनी हे शिवधनुष्य अगदी लीलया पेलले आहे. लालित्य पूर्ण भाषा, प्रसंगी वाक्रोक्तीचा सुंदर वापर, कधी अगदी सहज भावनाना हात घालत, वाचकाला विश्वासात घेत आणि निर्भीडपणे आपले मत मांडत ते ह्या लेखांचा प्रवास करतात.

विषयांचे वैविध्य, आणि वाचकाशी सरळ संवाद साधण्याची त्यांची शैली तुम्हाला खूपच आवडेल अशी आम्हाला खात्री आहे. 

तुम्हाला चिन्मय मांडलेकरांच्या व्यक्तिमत्वाचा तसा अपरिचित असलेल्या पैलूची ओळख करून देताना सृजन ला खूप आनंद होत आहे.  

सृजन


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि